Friday, November 28, 2014

माय मराठीचा प्रश्न


             नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो(?). जवळ जवळ ऐक वर्षानंतर लिहीत आहे. शासनाच्या .(डॉट) GOV .(dot) IN च्या महा जालात असा काही गुंतलो आहे की ब्लॉग ला द्यायला वेळच पुरत नाही. तसे म्हणायला बिन पगारी-पूर्ण अधिकारी म्हणावे अशीच गत आहे आपली. अर्थात पगार मिळतो महिन्याच्या महिन्याला,भरल्या पोटावरून हात फिरवायलाच पाहिजे. तर ते असो.

              माझ्या ब्लॉग च्या प्रोफाईल चे नांव मि माझा असे होते. ते वास्तविकतेत मी माझा असे हवे होते. “मि” आणि “मी” ह्याच्यातली शुध्द चुक माझ्यासारख्या मराठी वांग्मयाच्या विद्यार्थ्याच्या लक्षात एका विज्ञान शाखेच्या व्यक्तीने लक्षात आणुन द्यावी ह्यापेक्षा मोठी शरमेची बाब माझ्यासाठी कुठलीही नाही. हो पण ऐक महत्वाची बाब ही जवळ जवळ आपणा सर्वांना पटण्यासारखी आहे,ती  म्हणजे आपण आपल्या जन्मापासून मराठीच्या सानिध्यात वावरलो तरी छातीठोकपणे आपण असे म्हणू शकत नाही की मराठी व्याकरणात मी परिपूर्ण आहे. एरवी शालेय जीवनात “मेलेला हत्ती व्याकरणात चालवा” असे आपण अभ्यासले आहे. पण माझ्या वयक्तिक अनुभवातून सांगतो की माझ्या वर्गातील एका ही विद्यार्थ्याच्या हातून तो चालू शकला नाही. “ऐश्वर्या चंद्रासारखी सुंदर आहे” ह्यातील चंद्राची उपमा, ह्या अलंकाराच्या पल्याड कधी गेलीच नाही. इंग्रजी च्या सरांनी ग्रामर साठी मार मार मारण्यापेक्षा दोन छड्या मराठी व्याकरणासाठी का मारल्या नाहीत ह्याची खंत आता जाणवते आहे.

               अरे हो बरे आठवले.......! मराठी भाषेच्या शासकीय कामकाजात वापरासाठी ईथे काही पक्ष विधानसभेत आकांडतांडव करतांनी आपण नेहमीच पाहतो. माझी त्यांच्याकडे जाऊन मराठी व्याकरणाचे धडे गिरवण्याची खूप इच्छा होत आहे. नक्कीच त्यांना मराठीचे इत्यंभूत ज्ञान असेलच ह्याची मला खात्रीच(?) नव्हे तर विश्वास(?) आहे.
              आजपर्यंत नेहमी मला असे वाटत आले आहे की,मला इंग्रजी बोलता आली असती तर.............! ही इच्छा तीव्र होण्यामागे कारण ही तसेच आहे. कधी काळी ऐक व्यक्ती माझ्या बोलल्या गेलेल्या Attitude (एटीट्यूड) ह्या शब्दावर मनसोक्त हसली होती. त्यावेळी मला ती गोष्ट खूप टोचून गेली. आता मात्र त्या गोष्टीचे काहीच वाटत नाही. आपण आपली मातृभाषाच नीट बोलू शकत नसल्यावर अडीचशे वर्ष आपल्यावर राज करणाऱ्या फिरंग्यांची भाषा तरी कसी काय धड बोलणार???? तर ते असो. हा भाषेचा विषय एवढा मोठा आहे की त्यावर लिहिणे आणि भाष्य करण्याची आपली लायकी नाही. तरी माय मराठीचा प्रश्न आला तर आपल्या अकलेचे लक्तर वेशीवर टांगायला आपण एका पायावर तयार आहोत कारण आपली मातृभाषा आहे ना राजे हो. तर तूर्तास थांबतो. पुढे भेट होईलच.

1 comment:

  1. Dear Rawte ,
    Please Visit www.rdskendra.tk and share link very usefull services on your website. your website is very good. i hope you serve your visiter many services by www.rdskendra.tk

    ReplyDelete