Sunday, November 25, 2012

प्राजक्त


प्राजक्त
मित्रांनो, प्राजक्त आपल्याला परिचयाचा आहेच. पारिजातक देखील म्हणून बराच प्रसिद्धी पावलेला हा वृक्ष पृथ्वीवरील अस्तित्वात असलेल्या सात देववृक्षांपैकी एक वृक्ष आहे.(मला फक्त तुळस आणि पारिजातक असे फक्त दोन देववृक्ष माहित आहेत. बाकीचे पाच कुणाला माहित असतील तर कृपया अवश्य कळवावे,फार उपकार होतील J).
प्राजक्ताला पौराणिक महत्वही खूप आहे. प्राजक्ताचे झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणले. हे झाड कोठे लावावे यावरून सत्यभामा आणि रूक्मिणी यांच्यात वाद झाला. कृष्णाने ते सत्यभामाच्या अंगणी अशा ठिकाणी लावले की फुले उमलल्यावर रूक्मिणीच्या अंगणात पडावे.
अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. असो.......
प्राजक्ताची झाडे जंगलात मुक्त स्वरूपात खूप असतात. आजकाल बरयाच घरी अंगणात हा झाड दिसतो. वर्षातून फक्त दोन-अडीच महिनेच ह्याला फुले लागत असतात. आणि तरीपण जर प्राजक्ताला आपल्या परसात स्थान मिळतो म्हटल्यावर नक्कीच प्राजक्ताचे महत्व खूप वाढते.
प्राजक्ताला साधारण गणेश चतुर्थीच्या काळात खूप फुले लागतात. फुलांचा हा भार फक्त सूर्योदयापर्यंतच टिकून राहतो. जशी सूर्याची पहिली तिरीपीने फुलांना स्पर्श केला कि झाडाखाली गर्द शेंदरी रंगाच्या दांड्याच्या पांढऱ्याशुभ्र फुलाचा असा सडा पडतो कि, प्रथम दर्शनी असे वाटते जणू प्राजक्त पुष्पांचा जाणीवपूर्वक कुणी गालीचाच अंथरला आहे! अर्थात कुणी म्हणजे निसर्गाने आपल्या अलौकिक सौंदर्याची स्वतः पाखरण केलेली असते. प्राजक्त पहायला जेवढा सुंदर असतो तेवढाच त्याचा मादक सुगंध हि सुंदर असतो हे वेगळे सांगणे न लगे ! पुढे दिवाळी संपल्यावर जेव्हा फुलांचा बहर ओसरतो त्यानंतर झाडाला बिया लागतात. ह्या बिया झाडावरच सुकल्यानंतर त्यांची लागवड केली असता नवीन रोपटे तयार करता येऊ शकते..........आता तुमच्या घरी ते तयार होतीलच ह्याची खात्री स्पष्टपणे देता येणार नाही...........कारणही तसेच आहे,माझ्याच अनुभवातला एक उदाहरण आठवतो. सन २००९ ते २०१० ह्या कालावधीत मी MOIL (मेंग्नीज ओर इंडिया लिमिटेड) ह्या माईन मध्ये अप्रेंटीस म्हणून ट्रेनिंगला होतो. तिथे मी ‘श्री.राजेंद्र बढई’ नावाच्या हेड फिटर च्या देखरेखीखाली होतो. बढई काका खूप धार्मिक व्यक्ती होते. त्यांना हे कळल्यावर कि माझ्या घरी दोन पारिजातकाचे झाडे आहेत,ते खूप आनंदले. त्यांनी मला दुसऱ्याच दिवशी काही पारिजातकाची फुले सोबत घेऊन यायला सांगितले. सुदैवाने तो फुलं बहरण्याचा काळ होता. मी सोबत काही पारिजातकाची फुले,काही पाने आणि दोन तीन बिया घेऊन गेलो. त्यांना हे सांगितल्यावर कि पारिजातकाच्या पानाचा आणि तुळसीच्या पानाचा काढा एकत्रित रोज सकाळी घेतल्यावर महिन्या दोन महिन्याच्या नियमित उपचाराने वातविकार पूर्णपणे बरा होतो. ते अक्षरशः उडालेच. कारण ज्या व्यक्तीला वातविकार असतो त्याच्या वेदना शब्दात व्यक्त करण्या पलीकडच्या असतात. बरे त्या बिया त्यांनी मोठ्या आशेने घरी पोलीथीन मध्ये लावल्या. पण रोपटे जगायचे नाव नाही. मग त्यांनी पुनः मला अजून काही बिया मागून सरळ जिथे झाड लावायचा आहे त्या ठिकाणी त्या पुरल्या. ह्यावेळी नशिबाने रोपटे तर तयार झाले. पण एका फुटाच्या वर काही ते धकलेच नाही. पुढे तेहि रोपटे मेले हे वेगळे अजून काय सांगू???? असो.............सगळा नशिबाचाच खेळ म्हणायचा!  
पारिजातकाचे आयुर्वेदात देखील बरेच महत्व आहे. वात विकारासाठी पारिजातकाची पाने म्हणजे एक रामबाण उपाय. हल्ली रोज टीवीवर काही नं काही पहायला मिळते,ते दावा करतात कि ह्या तेलाच्या मालीश ने आपला वात पूर्णपणे बरा होईल.....वात बरा होवो न होवो तुमच्या खिशाचे नक्की बारा वाजतात.असो........ मला देखील संधीवाताने बरेच त्रस्त करून सोडले होते. आयुर्वेदिक,येलोपेथी आणि होमिओपॅथी औषधांवर हजारो रुपये खर्च करून देखील आराम काही पडत नव्हता. साधारण पेन किलर तर सोडा चक्क स्टेरोईड सारख्या मात्रा देखील माझ्यावर नापास झाल्या होत्या. अश्यात एक दिवस दोन इसम दुकाचीने माझ्या घरी आले आणि आमच्या परवानगीने पारिजातकाच्या काही फांद्या घेऊन गेले. चौकशीअंती कळाले कि ते लोक जवळजवळ ३०-४० किमी वरून फक्त पारिजातकाच्या पानासाठी आमच्याकडे आले होते. आमच्या गावातीलच त्यांच्या एका नातेवाईकाने त्यांना आमच्या पारिजातकाचा पत्ता दिला होता म्हणे. त्यांनीच वरवर माहिती पण दिली कि वातावर ह्याची पाने म्हणजे साक्षात संजीवनीच आहेत. आमच्या घरचा असा नियम आहे कि निदान औषधांच्या बाबतीत निम हकीमांचा वापर आम्ही अगत्याने टाळतो. कारण जान का खतरा कोन मोल घेणार???
असेच एकदा आस्था वाहिनीवर बालकृष्ण महाराज जे बाबा रामदेवांचे सहयोगी आहेत ते पारिजातकाची माहिती देत होते. सुदैवाने तो कार्यक्रम आमच्या पाहण्यात आला. मग प्रयोग म्हणून मी पारिजातकाची ५-७ पाने,सोबत तुळसीची २-३ पाने आणि मिळालाच तर पारिजातकाचाच एखादा फुल घेऊन त्याचा कुटून रस काढून रोज सकाळी एक कप पाण्यासोबत घेण चालू केला. आणि पुढील फक्त दिढ महिना नियमित त्याचा सेवन केला. ईश्वराची कृपा आणि पारिजातकाचा गुण असा कि मला त्या दिढ महिन्यानंतर पुढे कधीही,कुठलेही पेनकिलर खायची गरजच पडली नाही.
तर मित्रांनो असा दैवी चमत्कारिक ठेवा आपल्या परसात लावायलाच पाहिजे,नाही का?? शेवटी भगवान द्वारकाधीश श्रीकृष्णाच्या पवित्र परीसस्पर्शाने पावन झालेला देव वृक्ष आहे तो.
ll राम राम ll     

2 comments:

  1. RESPECTED PRAMOD JI .I HAVE COME ON YOUR BLOG FIRST TIME .YOUR BLOG IS VERY NICE BUT I CAN;T UNDERSTAND YOUR BLOG POST BECAUSE I DO NOT NO THIS LANGUAGE .WELL ...I JUST WANT TO GIVE YOU A LOT OF THANKS ON YOUR SUPERB COMMENT ON MY POST -''SONIYA JI KO JANM DIN KI HARDIK BADHAI '' BEST OF LUCK AND BEST WISHES FOR HAPPY BLOGGING .

    ReplyDelete
  2. Thanx Dr.Kaushik ji. Thank you for visiting on my new blogging exp. I frequently use 2 languages for my blog. Hindi and Marathi(maharashtrian). So sorry for inconvience. Bt overall Thanx for visiting.

    ReplyDelete