Wednesday, May 11, 2011

ये पड अशी निवांत - 1

1/2
ये पड अशी निवांत.... ...... घाबरू नकोस,
कईक वर्षांचा थकवा दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर,
समजायला लागल्यापास ून हे शरीराचं धन जपत असशील.
अगदी जागेपणी आणि झोपल्यावरह ी सुद्धा ...पण काळजी करू नकोस...
ये पड अशी निवांत.... ...... घाबरू नकोस.
तुझं शरीर हे तुझंच आहे ...तुझं मनही तुझंच आहे....... .
त्याही पेक्षा तुझी ईच्छा हि देखील तुझीच आहे....
तुझ्या ईछेशिवाय तुला स्पर्शही होणार नाही माझा.
झालाच तर सहजतेचा असेल तो, पण खटाटोपाचा कधीही नसेल.
हे वचन मी पाळेन जन्मभर .......... विसरू नकोस.
ये पड अशी निवांत.... ...... घाबरू नकोस.
तूच ये घन बनून आणि बरस तुला हवं तितकं माझ्यावर..
माती पहिल्या पावसाचे तुषार झेलतेना जसे,
तसंच माझं शरीर, मन, त्या झेलतील.
नवखे आहेत या प्रांतात ......... अगदीतुझ्यासारख ेच.....
त्यांनाही नीट चालता येत नाही...... ..
उलट तूच वाट दाखव तुला जमल्यास... ..
ये पड अशी निवांत.... ...... घाबरू नकोस.
जन्मलेलं पाखरू जसं पहिल्यांदा भिजतं ना पावसात,
तसंच काहीसं होणार आहे.
आणि मी हि रोमारोमाचं पात्र करून सामावून घेईन तुला त्यात.
इथे या पूर्वी कधीशब्दाचा पाऊस पडला नाहीये,
गंधाचा वारा देखील फिरकला नाहीये,
रुपाची चित्रे दिसली नाहीत कि, रसाची चवही चाखली नाहीये,
आणि स्पर्शाची लाटच काय पण तरंग देखील आलेला नाहीये.

ये पड अशी निवांत- 2

2/2
हि सर्वी कर्मेइंद्र िये, ज्ञानेदिये ,.........
इतकाच काय सारी शरीर पंचकसुद्धा संयमाच्या गुहेत तपच्छार्या करत आहेत.
हे चौरींशी तत्वांचे नैवेद्य ईश्वरापासू न अजून कुणालाच अर्पिले नाहीये,
पण आता तू बरस तुझ्या मर्जीने... .....
पूर्वीचं ताम्हनासार खं पवित्र असलेलं हे पात्र, तुझ्याशी सप्तपदी घेऊन...... ...
पंचपक्वन्न ांचा ताट झालं आहे,...... आता तुझी उष्टी पत्रावळ व्हायला देखील तयार आहे.
हे विसरू नकोस...... . ये पड अशी निवांत.... ...... घाबरू नकोस.
तुझं तरी काय वेगळं आहे म्हणा..... ...
सांडलिस जेव्हा या गुलाब पंखूड्यांव र नि लाजलीस,
त्यातना कळलं मला सारं...... ...तुझीही परिस्थिती माझ्या सारखीच आहे,
तुही यापूर्वी फक्त आकाशात चमकणाऱ्या विजेप्रमाण े तरळत गेली असशील मनात,
पण कुणावरच कोसळली नसशील..... ...म्हणून आज कोसळ...... ......
सप्तपदीप्र माणे कधी तू पुढे चाल, कधी मी चालेन, पण हातातला हात मात्र कायम ठेव,
आणि हे हि कि तुझं शरीर हे तुझंच आहे,
त्यावर ईछाही तुझीच चालणार,
त्या पुरवण्यास फक्त मी बांधील आहे आणि असणार. हे विसरू नकोस...... .
ये पड अशी निवांत.... ...... घाबरू नकोस.

Monday, May 9, 2011

प्रेम म्हणजे

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात?
असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे !
तरीसुद्धा, तरीसुद्धा
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं !
सोळा वर्षं सरली की अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात !
आठवतं ना, तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो,
होडीसकट बुडता बुडता वाचलो होतो!
बुडालो असतो तरीसुद्धा चाललं असतं,
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !
तुम्हाला ते कळलं होतं, मलासुद्धा कळलं होतं !
कारण,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
प्रेमबीम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं, मानणारी माणसं भेटतात !
असाच एक जण चक्क मला म्हणाला,
“आम्ही कधी बायकोला फिरायल नेलं नाही;
पाच मुलं झाली तरीप्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !
आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का?”
त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !”
तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्धं अर्धं खाल्लं असेल गोडीने !
भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन् तास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल !
प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !

Aai (charudatta)

जननी माझी तू,प्रतिमा तुझी साठवणी,
किती गं थांबवू मनास,येतात सारख्या आठवणी;
अशी कोणती तुला,झाली गं जायची घाई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
तुझंच बोट पकडून,पहिलं पाउल चाललो,
तोतार्या शब्दी पहिले "आई"म्हणूनचबोललो;
थकलो आता मी,तुला शोधता पाई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
उनाड लहानपणी,मार खाताना लपलो,
रात्री तुझ्याच हाथ-कुशीत,निर्धास्त झोपलो;
उब दिलीस तू,माया पदरा छाई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
ठेचकाळलो कधी,तर तूच पुसले अश्रू,
तुझा पदराचा वास कसा मी विसरू?;
या उजेडी दुनियेत,उरली काळोखाची शाई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
किती गं सहन केल्या,खोड्या तू माझ्या,
एकदा तर हाक दे म्हणून, ये रे माझ्या राज्या;
तुझ्या स्मरणांनी माझा, दाटून कंठ येई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
माझ्या विना कधी,घास नाही गीळलास,
चांगल्या शिकवणी तू, कान माझा पिळलास;
अझून त्या आठवणीने,कान लाल होई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
माझ्या तोंडून घास,आता नाही घेववत,
वेडावला तुझा मी,होतं तूच माझं दैवत;
तहानल्या जीवाची होती,तूच पाण-पोई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
सगळे असलेतरी,आता तूच नाही,
काय होत कसं सांगू,काही समजत नाही;
तूच भेटावी वाटतं,जरी मी कुठेजाई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
हे वरपांगी सुख,कसं मनी रुचवू,
तू नाही हे दुःख, कसं ग पचवू;
या हरवल्या पिल्लास,घे चरणा ठाई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई...!
तुझ्यासारखी माया,नाही कुठेच भेटत,
जड झालं आयुष्य,आता नाही रेटत;
कसं पेलू जीवन,झालं जड डोई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
ये न गं एकदा,घट्ट कुशीत पडू दे,
तुझ्या मांडी डोकावून,ढसा ढसा रडू दे;
जगी श्रीमंत मी,भिकारी तुझ्या विना माई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!