Monday, June 20, 2011

स्त्री चरित्र

स्त्री चरित्र
"काय ग, प्रेम करतेस न माझ्यावर?"


"हे काय रे विचारणं झालं? offcourse करते "

"मग माझ्यासोबत लग्नं का बर नाहि करणार?"

"तुला कसं रे सांगू आता? तुला नाही समजणार का ते!"
"आणि तुला स्वताला माहित आहे मी का नाहि म्हणतेय ते!"

"हेचं ना कि मी लाईफ मधे अजूनही सेटल नाहि झालोय "

"हो, अगदी बरोबर."

"पण काय गं एक सांगशील,मग तू आपले शरीर मला कसे काय सोपवले? "

"मी खूप प्रेम करते रे तुझ्यावर.......! शरीर काय, जर तू मला आपला जीव जरी मागितला न तर अगदी आत्ता द्यायला तयार आहे...!! मागून तर पहा एकदा,मागे हटणार नाहि."

"लग्नासाठी का नाहि मग ?"

"तुला कसे सांगू रे,एक मुलगी आपल्या भावी आयुष्याचा जोडीदार पहातानी असा विचार करते कि तो आपल्या पेक्षा दोन पाऊले पुढे असावा."

(जीव देणं परवडल,पण लग्नं मुळीच करणार नाहि तुझ्याशी :-) )