प्राजक्त
मित्रांनो, प्राजक्त आपल्याला परिचयाचा
आहेच. पारिजातक देखील म्हणून बराच प्रसिद्धी पावलेला हा वृक्ष पृथ्वीवरील
अस्तित्वात असलेल्या सात देववृक्षांपैकी एक वृक्ष आहे.(मला फक्त तुळस आणि पारिजातक
असे फक्त दोन देववृक्ष माहित आहेत. बाकीचे पाच कुणाला माहित असतील तर कृपया अवश्य
कळवावे,फार उपकार होतील J).
प्राजक्ताला पौराणिक महत्वही खूप आहे. प्राजक्ताचे
झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणले. हे झाड कोठे लावावे यावरून सत्यभामा आणि रूक्मिणी
यांच्यात वाद झाला. कृष्णाने ते सत्यभामाच्या अंगणी अशा ठिकाणी लावले की फुले
उमलल्यावर रूक्मिणीच्या अंगणात पडावे.
अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. असो.......
प्राजक्ताची झाडे जंगलात मुक्त स्वरूपात
खूप असतात. आजकाल बरयाच घरी अंगणात हा झाड दिसतो. वर्षातून फक्त दोन-अडीच महिनेच
ह्याला फुले लागत असतात. आणि तरीपण जर प्राजक्ताला आपल्या परसात स्थान मिळतो
म्हटल्यावर नक्कीच प्राजक्ताचे महत्व खूप वाढते.