नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो(?). जवळ जवळ ऐक वर्षानंतर लिहीत आहे.
शासनाच्या .(डॉट) GOV .(dot) IN च्या महा जालात असा काही गुंतलो आहे की ब्लॉग ला
द्यायला वेळच पुरत नाही. तसे म्हणायला बिन पगारी-पूर्ण अधिकारी म्हणावे अशीच गत
आहे आपली. अर्थात पगार मिळतो महिन्याच्या महिन्याला,भरल्या पोटावरून हात फिरवायलाच
पाहिजे. तर ते असो.
माझ्या ब्लॉग च्या प्रोफाईल चे नांव “मि माझा” असे होते. ते
वास्तविकतेत “मी माझा” असे हवे होते. “मि” आणि “मी” ह्याच्यातली शुध्द चुक
माझ्यासारख्या मराठी वांग्मयाच्या विद्यार्थ्याच्या लक्षात एका विज्ञान शाखेच्या
व्यक्तीने लक्षात आणुन द्यावी ह्यापेक्षा मोठी शरमेची