एकदा ७० भारतीय वैज्ञानिक एका महत्वपुर्ण अशा प्रकल्पावर काम करत होते , त्यामुळे साहजिकच ते प्रचंड तणावाखाली होती , आणि हा देशहिताचा प्रकल्प असल्यामुळे प्रत्येकजण अतोनात जीव ओतुन प्रामाणिकप णे ह्या प्रकल्पावर काम करत होते.....! !!
एके दिवशी सकाळी त्या प्रकल्पात काम करणारा , एक वैज्ञानिक तेथील बॉस कडे गेला आणि म्हणाला "सर मला आज संध्याकाळी ५.३० वाजताच घरी जायचे आहे , मी माझ्या मुलांना शहरात एक प्रदर्शन दाखविण्याच े वचन दिले आहे" , त्याच्या बॉसने ही गोष्ट मान्य केली , तो वैज्ञानिक अत्यंत मग्नतेने कामावर लागला , आणि जेव्हा त्याचे घड्याळाकडे लक्ष गेले तेव्हा रात्रीचे ८.३० वाजले होते ......
त्यानंतर जेव्हा तो वैज्ञानिक घरी आला तेव्हा त्याच्या मनात खुप विस्फोटक परिस्थिती होती , तो जेव्हा आत गेलातेव्हा त्याच्या पत्नीने न रागावता हसतमुखाने विचारल तुम्हाला कॉफी हवीय का? ही त्याच्यासा ठी विरोधात्मक परिस्थिती होती , जेव्हा त्याने मुलांची चौकशी केली तेव्हा त्याला समजले की त्याच्या बॉसने ५.१५ वाजताच मुलांना नेले होते ,.....
कारण जेव्हा तो काम करण्यात मग्न होता तेव्हा त्याच्या बॉसना ५ वाजता वाटले की ह्याला कामाच्या मग्नतेमध्य े वेळेचे भान रहाणार नाही त्यामळे ते स्वत: गेले होते.
आणि ते होते भारताचे लाडके मिसाईल मॅन व माजीराष्ट्रपती A.P.J. अब्दुल कलाम साहेब , त्यांच्याव त्यांच्या सहकार्याँच ्या ह्याच कामाच्या समर्पणामुळ े व एकमेकांच्य ा काळजी घेण्याच्या वृत्तीमुळे भारताने थुंभा येथुन अग्नी क्षेपणस्त् राचे यशस्वी प्रक्षेपण करुन दाखविले... ..!!!
Sunday, October 16, 2011
Tuesday, October 4, 2011
“प्रेम कसं असतं?”©चारुदत्त अघोर.
किती हटलीस एकदा म्हणत कि मला प्रेम खरच,कळतं का?
त्यावर मी म्हंटल ठीक आहे पाहूया,मला वळतं का;
तू म्हणालीस,सांग ना प्रेम हे कसं असतं?
मी म्हणालो प्रेम असं असतं.........
प्रेम हे करणारं नसतं,ते नकळत होणारं असतं,
एक चंदनित गंध,जे हलकं हलकं दरवळणारं असतं;
ते पुष्प जे,गजरी गोवणारं असतं,
मोगर्याचं फुल,जे वेणीत खोवणारं असतं;
एक रंगीत महेनत,जिच्यात रात्रंदिवस राबणारं असतं,
एक दवित थेंब,ज्याच्यात खोलवर डुबणारं असतं;
वाळूच्या कणाप्रमाणे,कधी हातून निसटणारं असतं,
श्रावणाची पहिली सर,जिच्यात चिंब भिजणारं असतं;
टप्पोरी गुलाब कळी,जिच्या काट्यातही गझलणारं असतं,
प्रेयसीच्या उबेत आठवूनच,गरमणारं असतं;
उमद्या रंगीत तारुण्यात,कधी निष्पाप बालकणारं असतं,
शृंगारीत मादक्तेत रंगूनही,कधी पालकणारं असतं;
विरहातही तुझ्या मिठीत लपणारं असतं,
कंठी ताईता प्रमाणे,तुला आजन्म जपणारं असतं;
कधी रुसल्या तुला,अलगद गुगुदावून खुलवणारं असतं,
चांदण्या रात्री,चंद्र नाहात झुल्यावर झुलणारं असतं;
कधी थकून लाडात,तुझ्या मांडी निजणारं असतं,
प्रणयीत ज्योती असूनही,रोज रात्री विझणारं असतं;
कधी मुद्दाम पाठी लागून तुला चिडवणारं असतं,
मुठीतला गजरा द्यालायला, तुला अडवणारं असतं;
मागून वेढांवून तुझ्या मानेवर नाक घासणारं असतं,
धुंदावून टाकणाऱ्या वेणीतल्या फुलाला वासणारं असतं;
अजून गं काय सांगू,प्रेम हे मदनीत पोरकट असूनही भारदस्त असतं,
ऐकत गाढ निजलेल्या माझ्या छातीवर,तुझ्याच सारखं निर्धास्त असतं......!!!!
चारुदत्त अघोर.(दि.१९/१/१ १)
Ref- http://m.facebook.com/photo.php?fbid=1531227937291&id=1732532170&refid=13&_rdr#1531243417678

Subscribe to:
Posts (Atom)