किती हटलीस एकदा म्हणत कि मला प्रेम खरच,कळतं का?
त्यावर मी म्हंटल ठीक आहे पाहूया,मला वळतं का;
तू म्हणालीस,सांग ना प्रेम हे कसं असतं?
मी म्हणालो प्रेम असं असतं.........
प्रेम हे करणारं नसतं,ते नकळत होणारं असतं,
एक चंदनित गंध,जे हलकं हलकं दरवळणारं असतं;
ते पुष्प जे,गजरी गोवणारं असतं,
मोगर्याचं फुल,जे वेणीत खोवणारं असतं;
एक रंगीत महेनत,जिच्यात रात्रंदिवस राबणारं असतं,
एक दवित थेंब,ज्याच्यात खोलवर डुबणारं असतं;
वाळूच्या कणाप्रमाणे,कधी हातून निसटणारं असतं,
श्रावणाची पहिली सर,जिच्यात चिंब भिजणारं असतं;
टप्पोरी गुलाब कळी,जिच्या काट्यातही गझलणारं असतं,
प्रेयसीच्या उबेत आठवूनच,गरमणारं असतं;
उमद्या रंगीत तारुण्यात,कधी निष्पाप बालकणारं असतं,
शृंगारीत मादक्तेत रंगूनही,कधी पालकणारं असतं;
विरहातही तुझ्या मिठीत लपणारं असतं,
कंठी ताईता प्रमाणे,तुला आजन्म जपणारं असतं;
कधी रुसल्या तुला,अलगद गुगुदावून खुलवणारं असतं,
चांदण्या रात्री,चंद्र नाहात झुल्यावर झुलणारं असतं;
कधी थकून लाडात,तुझ्या मांडी निजणारं असतं,
प्रणयीत ज्योती असूनही,रोज रात्री विझणारं असतं;
कधी मुद्दाम पाठी लागून तुला चिडवणारं असतं,
मुठीतला गजरा द्यालायला, तुला अडवणारं असतं;
मागून वेढांवून तुझ्या मानेवर नाक घासणारं असतं,
धुंदावून टाकणाऱ्या वेणीतल्या फुलाला वासणारं असतं;
अजून गं काय सांगू,प्रेम हे मदनीत पोरकट असूनही भारदस्त असतं,
ऐकत गाढ निजलेल्या माझ्या छातीवर,तुझ्याच सारखं निर्धास्त असतं......!!!!
चारुदत्त अघोर.(दि.१९/१/१ १)
Ref- http://m.facebook.com/photo.php?fbid=1531227937291&id=1732532170&refid=13&_rdr#1531243417678
No comments:
Post a Comment