तिनं माझ्या डोळ्यांत
बघितलं
आणि तिला जे कळायचं ते कळलं
नकळत हातात घेतलेला हात
तिने अगदी हळूवारपणे सोडवून घेतला
मग ....
मी नाहीच थांबवू शकलो,
तिच्या पापण्यांत डोकावणारी आसवं
माझ्या मनात येणारी आठवं
' मला उशीर होतोय मी निघते म्हणत '
तिची निरोप घेणारी पावलं..
No comments:
Post a Comment