Wednesday, May 11, 2011

ये पड अशी निवांत- 2

2/2
हि सर्वी कर्मेइंद्र िये, ज्ञानेदिये ,.........
इतकाच काय सारी शरीर पंचकसुद्धा संयमाच्या गुहेत तपच्छार्या करत आहेत.
हे चौरींशी तत्वांचे नैवेद्य ईश्वरापासू न अजून कुणालाच अर्पिले नाहीये,
पण आता तू बरस तुझ्या मर्जीने... .....
पूर्वीचं ताम्हनासार खं पवित्र असलेलं हे पात्र, तुझ्याशी सप्तपदी घेऊन...... ...
पंचपक्वन्न ांचा ताट झालं आहे,...... आता तुझी उष्टी पत्रावळ व्हायला देखील तयार आहे.
हे विसरू नकोस...... . ये पड अशी निवांत.... ...... घाबरू नकोस.
तुझं तरी काय वेगळं आहे म्हणा..... ...
सांडलिस जेव्हा या गुलाब पंखूड्यांव र नि लाजलीस,
त्यातना कळलं मला सारं...... ...तुझीही परिस्थिती माझ्या सारखीच आहे,
तुही यापूर्वी फक्त आकाशात चमकणाऱ्या विजेप्रमाण े तरळत गेली असशील मनात,
पण कुणावरच कोसळली नसशील..... ...म्हणून आज कोसळ...... ......
सप्तपदीप्र माणे कधी तू पुढे चाल, कधी मी चालेन, पण हातातला हात मात्र कायम ठेव,
आणि हे हि कि तुझं शरीर हे तुझंच आहे,
त्यावर ईछाही तुझीच चालणार,
त्या पुरवण्यास फक्त मी बांधील आहे आणि असणार. हे विसरू नकोस...... .
ये पड अशी निवांत.... ...... घाबरू नकोस.

Monday, May 9, 2011

प्रेम म्हणजे

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात?
असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे !
तरीसुद्धा, तरीसुद्धा
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं !
सोळा वर्षं सरली की अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात !
आठवतं ना, तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो,
होडीसकट बुडता बुडता वाचलो होतो!
बुडालो असतो तरीसुद्धा चाललं असतं,
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !
तुम्हाला ते कळलं होतं, मलासुद्धा कळलं होतं !
कारण,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
प्रेमबीम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं, मानणारी माणसं भेटतात !
असाच एक जण चक्क मला म्हणाला,
“आम्ही कधी बायकोला फिरायल नेलं नाही;
पाच मुलं झाली तरीप्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !
आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का?”
त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !”
तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्धं अर्धं खाल्लं असेल गोडीने !
भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन् तास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल !
प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !

Aai (charudatta)

जननी माझी तू,प्रतिमा तुझी साठवणी,
किती गं थांबवू मनास,येतात सारख्या आठवणी;
अशी कोणती तुला,झाली गं जायची घाई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
तुझंच बोट पकडून,पहिलं पाउल चाललो,
तोतार्या शब्दी पहिले "आई"म्हणूनचबोललो;
थकलो आता मी,तुला शोधता पाई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
उनाड लहानपणी,मार खाताना लपलो,
रात्री तुझ्याच हाथ-कुशीत,निर्धास्त झोपलो;
उब दिलीस तू,माया पदरा छाई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
ठेचकाळलो कधी,तर तूच पुसले अश्रू,
तुझा पदराचा वास कसा मी विसरू?;
या उजेडी दुनियेत,उरली काळोखाची शाई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
किती गं सहन केल्या,खोड्या तू माझ्या,
एकदा तर हाक दे म्हणून, ये रे माझ्या राज्या;
तुझ्या स्मरणांनी माझा, दाटून कंठ येई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
माझ्या विना कधी,घास नाही गीळलास,
चांगल्या शिकवणी तू, कान माझा पिळलास;
अझून त्या आठवणीने,कान लाल होई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
माझ्या तोंडून घास,आता नाही घेववत,
वेडावला तुझा मी,होतं तूच माझं दैवत;
तहानल्या जीवाची होती,तूच पाण-पोई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
सगळे असलेतरी,आता तूच नाही,
काय होत कसं सांगू,काही समजत नाही;
तूच भेटावी वाटतं,जरी मी कुठेजाई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
हे वरपांगी सुख,कसं मनी रुचवू,
तू नाही हे दुःख, कसं ग पचवू;
या हरवल्या पिल्लास,घे चरणा ठाई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई...!
तुझ्यासारखी माया,नाही कुठेच भेटत,
जड झालं आयुष्य,आता नाही रेटत;
कसं पेलू जीवन,झालं जड डोई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
ये न गं एकदा,घट्ट कुशीत पडू दे,
तुझ्या मांडी डोकावून,ढसा ढसा रडू दे;
जगी श्रीमंत मी,भिकारी तुझ्या विना माई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!

Wednesday, April 6, 2011

जनता के लोकपाल विधेयक (1/2)

1/2
ज्या लोकपाल विधेयकाच्या मुद्द्यावरून अण्णा हजारे आणि त्यांच्या समर्थकांनी देशभर आंदोलन छेडले आहे, ते लोकपाल विधेयक आहे तरी काय, याचा हा आढावा.
- पहिले लोकपाल विधेयक १९६९मध्ये म्हणजे ४२ वर्षांपूवीर् राज्यसभेत मांडले गेले.
- ते मंजूर न झाल्याने १९७१, १९७७, १९८५, १९८९, १९९६, १९९८, २००१, २००५ आणि २००८ मध्ये तेच लोकपाल विधेयक पुन:पुन्हा मांडण्यात आले.
-अद्यापही ते मंजूर झालेले नाही. त्यामुळेच सध्या भ्रष्टाचारविरोध ी कोणताही कायदा नाही.
- काही नव्या मागण्यांसह जन लोकपाल विधेयकासाठी नव्याने प्रयत्न सुरू झाले आहेत.
- डिसेंबर २०१० मध्ये नव्या विधेयकाचा मसुदा सरकारला सादर.
वेगळेपण
निवडणूक आयोगाप्रमाणे स्वतंत्र यंत्रणा असावी तसेच राजकीय व्यक्ती, नोकरशहांवर भ्रष्टाचार नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्याची तरतूद असावी.
नव्या मागण्या
- आता भ्रष्टाचारविरोध ी कायद्यांतर्गत केंदीय पातळीवरील मंत्र्यांचा समावेश व्हावा, अशी मागणी होत आहे. मात्र मसुदा बनविण्याच्या संयुक्त समितीत ५० टक्के सरकारी प्रतिनिधी तर ५० टक्के नागरिक आणि बुध्दिमंतांचे प्रतिनिधित्व असावे असा आग्रह अण्णा हजारे, किरणबेदी इत्यादींचा आहे आणि उपोषणातील हा प्रमुख मुद्दा आहे.

जनता के लोकपाल विधेयक

2/2
- तात्काळ निवाडा व्हावा.
- भ्रष्ट अधिकाऱ्यांना हटविण्याचे अधिकार
- कोणत्याही न्यायाधीशाच्या, अगदी भारताच्या सरन्यायाधीशांच् याही विरोधात थेट चौकशी आणि कारवाई करण्याचा अधिकार मिळावा. सध्या कोणत्याही न्यायाधीशाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी भारताच्या सरन्यायाधीशांची परवानगी घ्यावी लागते.
- लोकपाल समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवडीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीचा हस्तक्षेप असू नये.
- दोषी व्यक्तीला पाच वर्ष ते जास्तीत जास्त आजन्म कारावासाची शिक्षा असावी. सध्या ही शिक्षा सहा महिने ते सात वर्ष इतकी आहे.
मसुदा कोणी तयार केला
- शांती भूषण, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, निवृत्त न्या. संतोष हेगडे, अॅड. प्रशांत भूषण, माजी मुख्य निवडणूक आयुक्त जे. एम. लिंगडोह.
निवड समितीमध्ये कोण असावे?
- दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष
- सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ न्यायाधीश
- हायकोर्टाचे दोनवरिष्ठ मुख्य न्यायाधीश
- भारतीय वंशाचे नोबेल विजेते
- राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष
- भारतीय वंशाचे दोन मॅगसेसे पुरस्कार विजेते
- भारताचे महानियंत्रक आणि लेखापाल
कायद्याची व्याप्ती
- भ्रष्टाचार नियंत्रण कायदा, गैरव्यवहार या अंतर्गत केल्या गेलेल्या तक्रारींचा समावेश.
- तसेच या गैरव्यवहारांची माहिती देणाऱ्यांना संरक्षण.

Thursday, March 3, 2011

मैं किसी को वोट नहीं देना चाहता (धारा 49-O)

Negative Voting Indian Elections

क्या आप जानते हैंकि हमारे संविधान की एक धारा 49-O में एक प्रावधान है जिसके अनुसार किसी भी चुनाव मेंमतदाता पोलिंग बूथ पर जाये, अपनी पहचान और मतदाता क्रमांक साबित करे, अपनी उंगली पर स्याही लगवाये,और फ़िर चुनाव अधिकारी से यह कहेकि मैं किसी को वोट नहीं करना चाहता। सवाल उठता है कि हमें ऐसा क्यों करना चाहिये? मान लीजिये कि आपके वार्ड चुनावों में लगभग सारे प्रत्याशी या तो गुंडे-बदमाश हैं (90% तो होते ही हैं), या फ़िर कोई निकम्मा उम्मीदवार पुनः मैदान में है और आप चाहते हैं कि सभी तो नालायक हैं, मैं क्यों वोट दूँ? उस वक्त यह धारा काम आयेगी... मान लीजिये कि आपके वार्ड से कोई प्रत्याशी 123 वोटों से जीतता है, लेकिन यदि उसी वार्ड में 124 वोट “मुझे किसी को वोट नहीं देना” वाली धारा 49-O के निकलते हैं तो न सिर्फ़ उस प्रत्याशी का चुनाव रद्द हो जायेगा, बल्कि जब पुनः चुनाव होंगे उस वक्त पिछले सारे प्रत्याशियों को चुनाव में भाग लेने का मौका नहींमिलेगा, इस प्रकारअपने-आप सभी उम्मीदवार खारिज हो जायेंगे।
यह धारा “Conduct of Election Rules” सन्‌ १९६१ मेंउल्लिखित है। इस धारा को हमारे नेताओं ने जानबूझकर प्रचारित नहीं किया, लेकिन आश्चर्यजनक यह भी है कि चुनाव आयोग और शेषन जैसे अधिकारियों ने भी जनता को इस बारे में जागरूक करने का प्रयास नहीं किया। पड़ताल करने पर पता चला कि इस धारा के उपयोग और इलेक्ट्रानिक मशीनों में “निगेटिव” (इनमें से कोई नहीं) वाला बटन लगाने सम्बन्धी याचिका उच्चतम न्यायालय में लम्बित है, और उस पर निर्णय आना बाकी है। इस सम्बन्ध में पत्रकार एस.दोराईराज ने अप्रैल २००६ में एक लेख लिखा था|
गत वर्ष तमिलनाडु विधानसभा के दौरान वहाँ के मुख्य चुनाव अधिकारी नरेश गुप्ता ने स्वीकार किया था कि इस प्रकार के प्रावधान होने की जानकारी एक “एनजीओ” ने माँगी थी, कि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनों में भी “नकारात्मकवोटिंग” नामक एक बटन होना चाहिये। “पीपुल्स यूनियन फ़ॉर सिविल लिबर्टीज” नामक संस्था ने यह याचिका उच्चतम न्यायालय में लगाई है।

Wednesday, February 16, 2011

हो जाओ तय्यार साथियो

हो जाओ तय्यार साथियों, हो जाओ तय्यार ||
अर्पिता कर दो तन-मन-धन, मांग रहा बलिदान वतन
अगर देश के काम न आए तो जीवन बेकार |
सोचने का समय गया, उठो लिखो इतिहास नया
बंसी फेंको और उठालो हाथो में तलवार||
तूफानी गति रुके नही, शीश कटे पर झुके नही
ताने हुए माथे के सम्मुख ठहर न पातीहार |
काँप उठे धरती अम्बर, और उठा लो ऊंचा स्वर
कोटि कोटि कंठों से गूंजे धरम की जे जयकार |

Tuesday, February 8, 2011

तिच्यासोबत आज माझी शेवटची भेट

कारण तिच्यासोबत आज माझी शेवटची भेट होती !!
सारांच्या नजारा चुकवत ती आली
पण, तिच्या नजरेलानजर देण्याची हिमत नव्हती
नेहमीच चितकुन बसणारी ती
आज जरा अंतर ठेउन बसली होती
कारण तिच्यासोबत आज माझी शेवटची भेट होती !!
बरच काही बोलायचय होत
पण, शब्दांनी माझीसाथ सोडली
त्यांना तरी दोष देण्यात काय अर्थ
कारण तिला मी केव्हाच गमवली
कारण तिच्यासोबत आज माझी शेवटची भेट होती !!
i miss u म्हणत ती निघून गेली
आणि ती दिसेनाशी होईपर्यंत तिच्याकडे बघत होतो
आता फक्त तिच्या आठवणीवर आयुष काढायच
अस स्वतालाच समजावून सांगत होतो
कारण तिच्यासोबत आज माझी शेवटची भेट होती !! ~C.M.

Sunday, February 6, 2011

का इतका तिच्यात गुंततो ?

मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?
कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.
मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?
मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो..
-FB

Friday, February 4, 2011

मंत्रीरूपी जातीभेदाची कीड

मंत्रीरूपी जातीभेदाची कीड
Pages: (1/1)
charudutta_090 :
ओम साई
मंत्रीरूपी जातीभेदाची कीड
अजून किती दिवस चालणार हि जाती भेदाची साथ,
कधी खरे मानव बनूनपुढे कराल मैत्रीचे हाथ,
ज्या गोष्टींनी काहीच नाही निष्पन्न,तिचीच का हर तोंडी बात,
एक तोंड चूप राहिलं तर,चूप राहतील तोंडं सात,
खोटा जात अहंकार,जो मानवतेवर सदैव करतो घात,
मानवता धर्म जागृतावून,का कोणी करत नाही यावर मात;
सुवर्ण भूमी हि मुळातच जिची निर्मिती, तत्वाशील प्रज्ञात,
मग का राहावं इथल्या हर मानवानी,शैक्षणिकरित्या अज्ञात;
जाती भेद डंखावतात मंत्री, ज्यांची विषारी सर्पाची जात,
का कोणी उतरवत नाही,यांची जाती अहंकाराची कात;
आज जे माजून उसने मंत्री पद मिरवताहेत भ्रष्टाचारी तोर्यात,
तेच ओल्या मांजरी सारखे गुलाम बनले आहेत,अडकून अंडरवर्ल्डच्या भोर्यात;
दिवसा पांढर्या शुभ्र कपड्यातले बगळे हे,रात्री कावळे बनून थैमानतात वैभिचारी गळ्यात,
दारू मिळण्यासाठी बार बालांचा खून करणारे यांचे औलाद,जोपासले जातात जसे गुलाबफुल मळ्यात;
आज भ्रष्टाचारी मंत्री जे फुगलेत,आमच्याच पैशाचे अन्न खात,
उद्या सरळ होतील जेव्हां पडेल जबरदस्त जनतेची लाथ;
हेच खरे वाळवी जे पोखारतायेत,लोकांचे दिवस आणि रात,
मूल्य जपाची खोटी शपथ घेऊन,आसनाधिस्त होतात दाखवून नंगी जात;
जनतेचाच पैसा खाऊन,काळं करतात पैशाला,उघडून साखर कारखाने गावात,
निवडणुकी करिता मतं हवे म्हणून,उसन्या मार्दवी म्हणतात,काय पडलंय नावात;
उतरले जाईल ह्यांच्याच बरोबर जातीभेदाचे शत्रुत्व अजात,
पूर्ण भेदच वितळून एकावतील,विसरून धर्मीय जमात;
प्रेम,एकोप्याने नांदतील सारे,निरपेक्षित प्रेम-वर्तुळी आनंदी आनंदात,
जन,गण,मनास खरा सूरयेईल तेव्हां, हर मुख स्वरेल जेव्हां राष्ट्र गीत गात;
संपवा या द्रोहींना,जे विदेशी प्रतिनिधित्व करतात,खोकल्या आवात,
हेच संपले तर,एकवटेल नादून स्वर "वंदे मातरमाचा” तावात.
चारुदत्त अघोर.(२/२/११)